STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

खरखोट

खरखोट

1 min
291

खोट्याची साथ होती, फसवायचो स्वतःच स्वतःला.

एका साठी अजून एक, खोट बोलत गेलो जगाला.


अस वाटायच की, हळूहळू पचवतोय साऱ्या गोष्टी.

कधी तरी आंगलट येनार, तेव्हा जीभच ठरेल उष्टी.



उडाली होती झोप, सारखीच वाटायची भीती.

शेवटी पितळ उघड पडणार, झाकनार नेमक कुठ आणि किती.



एकदा प्रयत्न केला, खर बोलून पहावे.

काय व्हायचय ते होऊ दे, मात्र रात्रभर शांत झोपावे.



फरक पडला जाणवलेला, कोणी अंधारात नाही.

जसा असेल तसा तोच मी, पण आता विश्वासघातकी नाही.



आता सवय कर्तव्य जबाबदारी, म्हणून खर बोलतोय.

भीती कधीच गळून पडली, आनंदी आनंद जगतोय.


Rate this content
Log in