खरे चेहरे
खरे चेहरे
1 min
148
चेहरे खरे दिसतात केव्हा,
अडचणीत आपण सापडतो जेव्हा,
खरे-खोटयाचे दाखवतो रुप,
तेव्हाच कळते माणसाचे बदललेले रुप,
सोंग हजार करतात दिखाव्याचे,
गरज पडली तर पाय काढून घेतात
नाव घेऊन घरच्याचे,
तेव्हाच खोटी नाती ओळखायला मिळते,
ज्यांना आपले म्हणून मागे धावतो,
तेच अनोळखी का वाटते,
ज्यांच कधी आपण मन दु:खालं,
तेच अडचणीत सोबत दिसते,
ज्यांची कधीच ना कळली महती,
तेच आता जीवाभावाचे वाटते,
खरे चेहरे प्रेमाचे आपल्या,
वाईट दिवसातच दिसते
