खरा साज आहे
खरा साज आहे
1 min
436
तुझी गरज देवा मला आज आहे
तुझ्या मुखवटी जो खरा साज आहे
कुठे पण कळेना पराभव कुणाचा
खटकते मनाला किती राज आहे...
अबोला कशाला करे भावनांशी
कळू दे जगी बोल अंदाज आहे...
नवा जोश येतो पुढार्यात साऱ्या
विनाशी नशेचा जुना माज आहे...
उशीरा कळाले तुझे शब्द काही
कुठे आज वाटे मनी लाज आहे...
दिली फार शिक्षा जरी या जगाने
तुझे प्रेम फुलते अशी गाज आहे...
कितीदा भरवसा अटीवर टिकावा
वचन शब्द पक्के अशी गाज आहे...
