खोटी एकता
खोटी एकता
1 min
417
येथे मागू नको कुणाची तू साथ आता
धजावतों कुठे मदतीला हात आता
वेगळाल्या पेटतात एकाच घरात चुल्ही
मला खोटी वाटते एकतेची बात आता
आपल्याच लोकांनी केलेत घात आता
तेल असेपर्यंतच जळते आहे वात आता
जेव्हा फासले काळे प्रत्येकाने माणुसकीला
शिल्लक का ठेवावी ती मी माझ्यात आता
का ऐकुनी घ्यावी न पटणारी बात आता
का लावायची मनावर कुणाची बात आता
बोलणारे बोलतील त्यांच्याच सोयीचे सारे
कुठवर सहन करायचे ते आघात आता
