खोगीर
खोगीर
1 min
315
धन नाही रुपं
पोटातील भूकं
भक्षीता खूपं
घालेन कुपं तृष्णेला
धन नाही जडी
निसर्गाचा वर
कढवीता फार
उतरेन अर्क आयुष्याचा
धन नाही खरी
प्रीत माऊलीची
होता अधीर
जात होईन रुधीराची
धन नाही सरी
सावनात बरसे
नाची मयूर
उमटेन चित्र भविष्याचे
धन नाही ओळ
तुक्याच्या अभंगाची
सांडीता वर्तनी
जाईन अवकळा माणसाची
धन नाही मार्गी
मुक्तीचे दार
माणसाचा सार
पार नये जीवनाचा
