Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bal Zodage

Tragedy

4.4  

Bal Zodage

Tragedy

खंत पाखराची

खंत पाखराची

1 min
330


अरं पावसा पावसा

असा का रं रुष्टला?

घरट्यात तान्हं माझं

त्याला चारा रं कुठला!


सारं शिवार मी हिंडलं

पाणी टिपूस ना गवसलं

रानं भळ्यांनी माखली

झाडं ओकी-बोकी झाली


चारा-पाणी ना जनावरा 

दीनवाण्यांची दैना उठली

घालमेल धन्याच्या जीवाची

अश्रुधारा वाहती गाली


अन्नदाता माझा शेतकरीदादा

कर्जाच्या ओझ्यानं वाकला

भाळी माती-अबीर लावूनी

चातकासम बघतो ढगाला


चराचरात मेघराजा

नवचैतन्य सळसळू दे

झाडं-वेली-पानं-फुलं

ताजीतवानी होऊ दे


हालगी-लेझीम तालावर

अन्नदाता माझा नाचू दे

आम्हा पाखरांच्या गाण्यानं

सारा आसमंत गुंजू दे


अरं पावसा पावसा

असा पडून जा एकदा

मुसळधार पावसाचं स्वप्न

खरं करुन जा एकदा 


Rate this content
Log in