STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

खिडकी

खिडकी

1 min
11.4K

छोटंसं जग दिसायचं, तेवढ्याच एका जागेतून

सगळ्या वयांची हालचाल, आवाज यायचा बागेतून


आतापर्यंत कधीच लक्ष गेलं नाही, साधा विचारही नाही

आज घरात कोंडल्या गेलो, तेव्हा तुझ्याशी गप्पा मारू पाही


फक्त हवा आणि उजेड येण्यासाठी वापर, एवढाच समज होता

बुद्धीवर प्रकाश पडला, तेव्हा समजले हा समजच खोटा


छोटं दिसत असलं, तरी खूप मोठं जग होतं

याआधी या डोळ्यांनी, ते कधीच पाहिलं नव्हतं


विलक्षण आवाजाच्या माहितीसाठी, फक्त हिचा उपयोग

आता मुद्दामून किंवा बळजबरी, रोज घेतो उपभोग


हल्ली येता जाता तिला पाहून, नजर होते बेडकी

केवढं मोठं जग पाहतोय, स्तब्ध उभा खिडकी


Rate this content
Log in