खेळ
खेळ
1 min
140
खेळ ...
सारीपाट रंगतो जीवनात
कैक अनुभव घेऊन
वजीर रमतो प्यादीसह
डाव सोनेरी खेळुन
एकेक चाल ऊधळती
क्षण हवेसे नकोसे
धावपळ करुनी यशप्राप्त्यर्थ
अश्वही सदैव हसे
दिस मास सरता
वर्षे कर्तृत्वे फुलती
नृप एकमेव विजेता
आयुष्याचा अखंड सारथी
