खेळ
खेळ
1 min
227
ऋणानूबंध ते रेशमी धागे.
उबदार उशीची वीण ती .
मयंक चांदण्या राती माळीतो .
हृदयातली तागी क्षीण ती.
कुणास आपुल्या मनात पाहू.
हृदयास आपुल्या क्षणात वाहू.
नाती गोती जीर्ण होती.
फुंकरलेल्या अक्षणात न्हाहू.
रूणझुणत किणकीणला .
आकाशातील श्वास.
पडतो मग तारा धरावर.
सोडुनी सुटकेचा निश्वास.
मागचे काही राहून गेले.
गाठ ती बांधून पुन्हा जनले.
गोड खळी ती गालावरती.
बघताच नवीन नाते बनले.
खेळ सुरू तो कृष्णहरीचा.
राधा नाते शोधित राही.
उसवून धागे जुने पुराणे.
नव चैतन्य निर्मित काही.
बासरी च्या सुरात वृत्तबंध.
भावनांचे संध अनिल-बंध.
कुणी ऋणवई कुणी ऋणीया.
ऋणानूबंध ते ऋणानूबंध.
