खेळ...
खेळ...
आठवतात ते दिवस लहानपणीचे...
पकडा पकडीच्या खेळात जायचे...
पळायचो आम्ही वाऱ्यासारखे...
एखाद्या धावपटू सारखे...
कोपऱ्यात लपून लंपडावही खेळायचो...
एका पायावर लंगडी घालूनही जिंकायचो...
इतर मैदानी खेळ खेळून थकायचा जीव...
मग लवकर आम्ही झोपी जाऊ गुपचूप...
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी...
आता मात्र परिस्थिती आहे बदलली...
मोबाईलने कब्जा केला सगळ्या खेळांवर...
मुलंही गुंतली बोट फिरवून खेळण्यास मोबाईलवर...
तसंही म्हणा आता राहिली कुठे मैदाने...
त्या जागेवर फ्लॅट्स, अपार्टमेंट आणि भरली दुकाने...
आमचं बालपण खरंच होतं अविस्मरणीय...
आताचं बालपण मात्र मोबाईलच्या गेममध्ये अडकलयं...
