STORYMIRROR

vanita shinde

Others

3  

vanita shinde

Others

खेळ

खेळ

1 min
263

वाहते मोकाट आहे आज का हे धुंद वारे

माणसाचे माणसाशी एक नाते जोडणारे


बंधनांची दोर तुटली गोड नाती दूर गेली

खंत वाटे ना कुणाही मर्म आहे बोचणारे


स्वार्थ फुलला प्रेम हरले जीवनाचे हेच कोडे

देत नाही साथ आता आपलेसे वाटणारे 


वार होता काळजावर का कुणी ना जाणला रे

सोसलेही या मनाने जीवनाचे भोग सारे


वेदनेला अंत नाही दु:ख तेव्हा फार होते

घालती ते घाव जेव्हा आस वेडी जाळणारे


जीवनाला अर्थ नाही सर्व काही व्यर्थ झाले

मांडलेला डाव मोडी खेळ खोटा खेळणारे


खेळ होतो जीवनाचा ना कुणाला खेद वाटे

आपले ज्याला म्हणावे तेच होते तोडणारे


अंतरीच्या भावनांनी अंतरातच वार केले

आठवांनी वाट करता पाट वाही दाटणारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन