STORYMIRROR

Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

खेळ हा नशीबाचा

खेळ हा नशीबाचा

1 min
28K


खेळ हा नशीबाचा न्यारा

शरीराची ही विफलता जरा

सहाय्याने जगतो मी जरा

जय जय शिव शंकरा

पाऊल अडकडे,तोल ना सावरे

हास्याची मी भासे हो व्यंगचित्रे

पाहताच जो-तो हसतो 

चिडवण्याची मला दिसतात चित्रे

ओझे इतरांना येथे वाटे

आई-वडीलांना हे ग्रासे

चितं होऊन चिंता चेहऱ्यावर असे

आम्हचं हेच दु:ख असे

द्वेषाची भाषा,भिकेची ही शिक्षा

नको रे देवा अशी ही दक्षा

भावनेचा हा हुंदका,फोडून ना फुटला

अशी ही माझ्या आयुष्याची कक्षा

कसे लढावे,कसे उरावे

पडतो हा रोजचा प्रश्न ?

आयुष्याचे हे कोडे ना सुटे

जगण्याचा तर आहे हा प्रश्न?


Rate this content
Log in