खेड्यातील भारत
खेड्यातील भारत
1 min
470
इथे दिसते निरागस त्या
निसर्गाचे अफाट साैंदर्य
माणुसकी,प्रेम ,जिव्हाळा
अन् माणसातील औदार्य
सुख ,शांती आणि लक्ष्मी
नांदते इथे शेतकऱ्या घरी
येता संकट सेल्फी नाही तर
धावून एकमेकांना ते सावरी
घासातील घास ते स्वतःचा
एकमेकांना वाटून खातात
असो कुणीही.. परका नाही
तर त्याला आपला समजतात
खेड्यातील भारत माझा
रोशन करतोय देशाचे नाव
कमी न समजावे कुणीही
जरी असेल आमचे खेडे गाव
