खडू फळा मुलं
खडू फळा मुलं
1 min
24.3K
माझा रंगीतसंगीत खडू
माझी वाट पाहतोय
माझा काळा काळा फळा
मला ये म्हणून खुणावतोय...
पण हाय! काय करावे?
बाहेरच पडता येईना
कोरोनाने हाहाकार माजवलाय
काहीच सध्या उमजेना....
माझी मुलं नाचताना आठवतात
निरागस चेहरे समोर येतात
बाई,बाई हाक कानी येते
सतत हेच भास हो होतात....
अभ्यास देतेय व्हाॅटसॅपवर
पण तन,मन शाळेत असे झालेय
कधी माझ्या पाखरांना भेटतेय
असे मला सदैव वाटतेय.....
तो परिपाठ,ती चिमणीपाखरं
सारे सारे मी मिस करतेय
त्यांचे माझ्यावरील प्रेम
सतत मला आठवतेय,......