खचू नकोस
खचू नकोस
खचू नकोस खचू नकोस
आयुष्यात कधी खचू नकोस
स्वतःच्या कर्तृत्वाने
निर्माण कर एक नवं विश्व
पण ते विश्व निर्माण करताना
स्वतःचा साधेपणा सोडू नकोस
खचू नकोस खचू नकोस
आयुष्यात कधी खचू नकोस
जीवनाच्या वाटेत येतील अनेक संकटे
तुझ्या यशाचा अडथळा होण्यासाठी
त्या संकटांना हिमतीने तोंड दे
संकटांना पाहून तू कधी भिऊ नकोस
खचू नकोस खचू नकोस
आयुष्यात कधी खचू नकोस
खरं प्रेम खूप कमी जणांच्या
नशिबात असतं
ज्यांच्या नसतं त्यांना जाणीव असते
अन ज्याच्या असतं त्यांना दिसत नाही
प्रेम हे उघड्या डोळ्यांनी करावं
बंद डोळ्यांनी नाही म्हणून
तुझ्या प्रेमाला कधी आंधळं समजू नकोस
खचू नकोस खचू नकोस
आयुष्यात कधी खचू नकोस
विश्वास ठेव थोडा स्वतःवर
तुला यश नक्की प्राप्त होईल
नाय सगळ्यांना पण स्वतःला
जाणीव नक्की होईल
आयुष्यात नेहमी पुढचा विचार कर
मागे वळून पाहू नकोस
खचू नकोस खचू नकोस
आयुष्यात कधी खचू नकोस
