STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

खास मोमेंट- सेल्फो की चित्र?

खास मोमेंट- सेल्फो की चित्र?

1 min
636

सात्विक, समाधानी आईचा चेहरा

डोईवर घेतलेला साडीचा पदर छान

बाळाचेही नवीन कपडे

पावडर, टिका लावुन नटला छान!


आईच्या कडेवर खेळत होता तो तिच्या पदराशी

आईने तर दोन हातांनी घट्ट पकडून 

छाती, खांद्यावर डोके ठेवण्यास

सुरक्षेचे कडे बनवले होते त्याच्या भोवती!


आई वाटत होती समाधानी

पहिल्याच आपल्या मुला मुळे

उंचावली गेली होती

तिची समाजात शान अन् मान!


नसेल आता कोणता तगादा

घराण्याला मुली नको मुलगाच पाहिजे

नसेल समाजात नाच्चकी

जग तिचे असेल आता फक्त त्याच्याच अवतीभवती फिरलेले!


डिजीटल जगात 'सेल्फी' काढून साठवायचे हे क्षण खास

तर फोटोग्राफरला शोधत फिरावे लागेल आपला कॅमेरा सेट करून

नको एवढा वेळ दवडाया

चित्रकाराकडुन चित्र रंगवून घेऊ 

आणि करू हा ' मोमेंट' खास ...


चित्रकाराने चित्र रंगवले

त्याच्या मनात वसलेल्या

बाळ कडेवर असलेल्या आईचे

आणि करून दिला 'मोमेंट खास' 


वर्षानु व वर्ष भिंतीवरी सतत डोळ्यासमोर असेल ते चित्र

लटकलेले आता छान!


Rate this content
Log in