Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Supriya Devkar

Others

4.3  

Supriya Devkar

Others

खास मित्र

खास मित्र

1 min
459


त्याने हळूच मागून यावं 

पाठीवर द्यावा धपाटा 

मला उगाच चिडवून

खावा हातचा रपाटा

त्याचं बोलणं ऐकून 

द्याव्यात मी चार शिव्या 

मनात राग न धरता 

त्याला त्या वाटाव्यात हव्या.

त्याने करावी माझी थट्टा 

मग मी उगाचच रूसाव

माझी समजूत काढताना 

मी मात्र जोराने हसाव.

कठीण विषय हाताळताना 

त्याने ही व्हाव गंभीर 

न डगमगता उभा रहाव

पाठीशी त्याने खंबीर .

खास मित्र असा असावा 

एक तरी जिवनात 

त्याची जागा पक्की असावी

खोलवर आपल्या मनात. 


Rate this content
Log in