खास चूक
खास चूक
1 min
616
एकट्यानं केलेल्या चुका एकट्यालाच खुणावतात.
मनातल्या मनात का होईना स्वतःलाच सुनावतात.
प्रसन्न मुद्रा कासावीस जीवाची लपवते.
मस्तकी परत तीच तीच चूक आठवते.
छोटी मोठी कशीही होती ती चूक.
आता देहाला पश्चातापाची गरज होती खूप.
शेवटी एकच खरं सगळं ठीक करणार होत.
मनस्तापापुढे माझ चालत नव्हतं डोकं.
प्रत्येक सुख दुखात ती मला कायम आठवायची.
चूक होतीच एवढी खास आयुष्याभर पाठ नाही सोडायची.
