खाकी वैद्य
खाकी वैद्य
झाले अशांत आज, हे चक्र अवनीचे.
माणसांना कोंडून ठेवा, जसे जनावरे दावणीचे.
आज अचानक सगळे घाबरले, ध्यास लागला धास्तीचा.
एकच संकट सगळ्यापुढे, श्वास रोखला वस्तीचा.
समजून घ्या थांबून लढायचे, की लढून थांबायचे.
स्वतःला संपउन नंतर, काय काय ते वाचवायचे.
वाचायचे असेल तर, संयम बाळगा थोडा.
घराच्या साठीच का होईना, घरच्यांना घरातच कोंडा.
घरी थांबणे थोडे, नाही ही कसलीही कैद.
उत्तर द्याया त्या संकटा, धाऊन आले वैद्य.
थोडीशी जागा थोड अन्नपाणी, गरजा काय त्या बाकी.
आपल्याला फक्त साथ द्यायची आहे, बाकी समर्थ आहे खाकी.
