केव्हातरी
केव्हातरी
1 min
212
केव्हातरी हो होते शब्दांची भेट
शब्द भेटून सांगती मनाचे हीतगुज
होती मग गुजगोष्टी आणि काही
कानगोष्टी ,होते तयार त्यातुनी
कविता माझ्या मनी ,एक एक
अक्षर जोडिता होते अक्षरांची माळ
जैसे सुमन सुत्रासंगे ओविता दिसे हार ,पुष्पे शोभती सुदंर गुंफता
पुष्पहार ,शब्द जोडुनिया होई
काव्यरूपी सुमहार ,केव्हा शब्दही
सांगती काव्यरुपी गुणगाणं होई
कविता तयार मनोमनी फुले हार
अंतरात होई मग कविता सुंदर
कवितेच्या प्रवाहात मन वाहत
जात ,वाहता वाहता देई शब्दांना
संजीवनी ,शब्द संजीवन होती
काव्य पसरे चौफेर ,काव्यरुपी
प्रवाह हा वाहे मनामनातून सारे
घेती मग आनंद पसरे काव्याचा
