केमीकल्सचा मसाला
केमीकल्सचा मसाला
पाश्चराईज्ड दुधामध्ये पाहून केमीकल्सचा मसाला
कार्बनच्या काळ्या ढगांआडून निसर्ग आर्टीफिशीयलपणे हसला
पुरणपोळीसाठी आता ‘मेटॅनिल यलो’ची डाळ,
पिवळयाधम्मक कच्च्या केळ्यांचा हा मॅग्नेशिमयुक्त काळ.
ग्लुकोजवाल्यांच्या जिभेवरती शुगर ‘फ्री’चे स्वीट,
ब्लडप्रेशरच्या नाकावर टिच्चून अजिनोमोटोचे मीठ.
फॅक्टरीतल्या प्रोडक्ट्सना देतात नॅचरल-हर्बल नाव,
केमिकल्सच्या डुप्लीकेट पदार्थांना ओरीजीनलचा भाव.
चायनाच्या युगात सुद्धा इंडियन सत्वाची नांदी व्हावी,
चमच्याच्या सिल्व्हर डिस्प्लेने तुम्हा सर्वांची चांदी व्हावी.
