केक
केक
1 min
237
घालावे दही अर्धी वाटी
घेऊनी एक वाटी रवा
फेटूनी छान मग
साखरेस वाव द्यावा
दूध आणि तूप घालुनी
होते मिश्रण पातळसर
बेकिंग सोडा अन् बेकिंग पावडर
घालावी त्यात चमचाभर
मिश्रण ओतावे केकपात्रात
लावूनी त्यास तूप
करावी सजावट घालुनी
काजू बदामाचे काप
गॅसवर कढईत घालुनी मीठ
त्यावर ठेवावे हे पात्र
झाकण ठेवुनी तीस मिनिटे
चालू ठेवावे केकचे हे सत्र