STORYMIRROR

bhavana bhalerao

Others

3  

bhavana bhalerao

Others

कधीतरी

कधीतरी

1 min
401

कधीतरी पुरूषांसारखे वागणे जमायला हवे

पर्स न अङकवता बाहेर पडायला हवे

मित्रासाठी कायपण... करायला हवे

एकच शर्ट असला तरीपण लग्न, मुंज, बारसे जायला हवे 


छोट्याछोट्या कुरकुरी न करता 

मजेत फिरायला हवे 

पटकन ङ्रेस घालून मेकअप करायला शिकायला हवे

कधीतरी पुरुषांसारखे वागणे जमायला हवे


शाळेतले दोस्त पन्नाशीतही जपता यायला हवे,

नको ते मनातून काढायला हवे

माझे घर, माझी अशीच पद्धत, हे सोडायला हवे 

कधीतरी पुरुषांसारखे वागणे जमायला हवे


घरातला पसारा, पलंगावरच्या ओला टाॅवेल आणि कपङे विसरायला हवे,

थोडेसे दूध ऊतु गेले तरी सहन करायला हवे

कधीतरी पुरुषांसारखे वागणे जमायला हवे


सगळे रुसवे फुगवे सोङून, कुटुंबासाठी काहीतरी कमवायला हवे

तुझं काय माझं काय सगळं सोङून द्यायला हवे

खंबीर होऊन जगापुढे जगायला हवे

कधीतरी पुरुषांसारखे वागणे जमायला हवे


Rate this content
Log in