STORYMIRROR

Deore Vaishali

Others

3  

Deore Vaishali

Others

कधीतरी...

कधीतरी...

1 min
197

कधीतरी हसावं ही,

कधीतरी बहरावं ही,

मागच्या गोष्टी विसरून,

स्वत:मध्ये रमावं ही.....


कधीतरी रडावं ही,

जरा मनाला हलकं करावं ही,

होईल डोळ्यांना थोडा ञास,

पण जरा मनाना शांत करावं ही....


डोळ्यांनीच का बोलावं,

बोलुन द्याव ओठांना ही,

मोकळ्या कराव्यात

मनात साठवलेल्या भावनां ही...


मनमोकळ जगावं ही,

कधीतरी फुलावं ही,

मरायचं तर रोजच आहे,

जगावं कधीतरी आनंदाने ही


Rate this content
Log in