STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

कधीतरी असे ही व्हावे

कधीतरी असे ही व्हावे

1 min
169

कधीतरी असे ही व्हावे... 

तहानलेल्या आठवाणींनी

अचानक चिंब भिजावे.... 

अन् मनातल्या मरगळीने 

पाण्यात विरुन जावे... 

कधीतरी असे ही व्हावे


कधीतरी असे ही व्हावे

अनपेक्षित पणे इच्छांची 

पूर्ती व्हावी

अन् मनकवड्या सारखे समोरच्याने 

सहज मनातले ओळखावे

कधीतरी असे ही व्हावे


कधीतरी असे ही व्हावे

नात्यांमध्ये पडलेल्या गाठी

सहज सुटाव्यात..... 

अन् कळवटलेल्या मनाने पुन्हा

अमृताचे बोट चाखावे

कधीतरी असे ही व्हावे


कधीतरी असे ही व्हावे

अमावसेच्या गर्द अंधारात

काजव्यांनी मार्गस्थ व्हावे

अन् अवचितपणे तू येऊन

हळूवारपणे हात हातात घ्यावे

कधीतरी असे ही व्हावे...


Rate this content
Log in