कधीही
कधीही
1 min
314
कधी झाडातून
कधी मनातून
कधी भिजत
कधी भिजवत
कधी हळवा स्पर्श
कधी धसमुसळा स्पर्श
कधी रंगलेला
कधी रंगवलेला
कधी मुक्यान अवचित..
पण
आता
अडखळू नकोस भांबावू नकोस
नकोस शोधूस सावलीचा आसरा
वठलेली निष्पर्ण फांदी वाट पाहतेय
आसक्त डोळ्यांनी मौन श्वासांनी
त्या रेशमी स्पंदनासाठी...
