कधी येशील तू
कधी येशील तू
1 min
252
वाट पाहुनी थकले डोळे
चालून पायात आले गोळे
वर्षे सरले पाहिले ना सोहळे
मजला सांग कधी येशील तू
मनी माझ्या तुझीच आहे आस
तू असल्याचा नेहमी वाटतो भास
तुझ्यात अडकून आहे माझा श्वास
मजला सांग कधी येशील तू
फक्त तुझ्याविषयी सारेच बोलती
तुझ्याच गोष्टी नेहमी मला सांगती
मला वाटे तू आहेस अवतीभवती
मजला सांग कधी येशील तू
खूप झाला त्रास सहन होत नाही
तुझ्याविना जीवन आहे अधुरी
तुझ्याच प्रतीक्षेत जगतो अजुनही
मजला सांग कधी येशील तू
