Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

कधी संपेल कोरोनाचे सावट

कधी संपेल कोरोनाचे सावट

1 min
210


कोरोनाची नका बाळगू भीती

धैर्याने त्याच्याशी लढा देऊया

हिंमतीने मुकाबला करूया

कोरोनाचे सावट जगातून दूर करूया

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

पसरला आहे कोरोनाचा आजार

जपून करावा लागतो आहे

कोरोनाच्या रुग्णावर उपचार

कोरोनामुळे आजच्या समाजात

पसरली आहे सगळीकडे भीती 

दूर दूर होत गेली सर्वांची

माणसातील माणुसकीची नाती

प्रश्न पडला आहे साऱ्या जगाला

घाबरू लागले आहेत या विषाणूला

कधी संपेल कोरोनाचे सावट

पूर्वीसारखे जीवन होईल आपुले

विस्कळीत झाले जनजीवन

कोलमडली आहे अर्थव्यवस्था

सारेजण उपाय करून थकले

परंतु कोरोनाला दुर करू नाही शकले 

बंदिस्त झाले घरातच सारेजण

काम धाम सारे काही विसरून गेले

तुला हाकलण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न केला

निक्षून सांगते कोरोना तुला

धाक तू मृत्यूचा आम्हाला दाखवतोस

काही दिवसांनी जगात तुझे नाव सुद्धा उरणार नाही

प्रत्येक गोष्टीला असतो अंत शेवटी 

तुला हाकलून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही

कोरोनाचे सावट दूर केल्याशिवाय राहणार नाही


Rate this content
Log in