कधी कळणार मानवा
कधी कळणार मानवा
1 min
343
कधी कळणार मानवा
कोरोनाचा मृत्यू नाही सोपा
सरकारचे नियम मोडून
का पत्करतोय धोका?
नजर चुकवून पोलिसांची
उगाच बाहेर फिरतोय
विचार करून बघ जरा
कोणाला तू फसवतोय
संसर्ग कोरोना विषाणूचा
पटीपटीने पसरतोय
मृत्यू वायु वेगाने
जवळ तुझ्या येतोय
स्वतःच्या स्वार्थासाठी
जीव इतरांचा घेतोय
कशासाठी पुन्हा पुन्हा
जनसंपर्कात जातोय
एकांत हा काही काळचं
तर आहे सोसायचा
विचार कर अजूनही
स्वतःच्या भविष्याचा
