कधी कधी ज्याचां चेहरा
कधी कधी ज्याचां चेहरा
कधी कधी ज्याचां चेहरा
पाहु वाटतं नाहीं तो समोरचं दिसतो
कधी कधी नको दिसायला अस होतो
एक अनुभव आलेला असतो
तोच प्रत्येकाला छळतो.....
आपल्याला ज्याला भेटायला जायचं आहे
त्याला आपण कधीच भेटत नाहीत.
जवळ असताना कधी गेलो नाही दूर गेल्यावर
सारख जाऊ वाटतं. असं प्रत्येकाला होत.....
कधी कधी जाऊ वाटतं नाहीं
तरी मनाला तयार व्हावं लागतं
पाठीमागे कुणी नको बोलायला
चर्चा होईल आजूबाजूला अशी
भिती राहते प्रत्येकाला.......
आपल्याला खूप कांही करु वाटते
आपलं मन नाहीं देत साथ
आपलीच नाती देत नाही मदतीचा हात
आजच्या घडीला आपल्यालाचं मागे खेचतात......
आजच्या घडीला आपल्या घरीं कुणी पाहुणे आले
तरी कधी लवकर जातील अस होत मनाला
त्याच्या घरीं गेले की आपल्या घरीं कधी जाईल
असं होतं प्रत्येकाला....
मनात कित्तीही स्वप्नं असतील मोठे
पूर्ण करताना दिवस पडतात अपुरे
आज आपण केलेले कष्ट त्याचे होतं चीझ
शरीरातील हाडांची झालेली असते झीज....
आठवणी येताना इतक्या येतात
डोळे सुध्दा भेटायला तरस्तात
बोलताना शब्द सुध्दा अपुरे होतात
रागवतांना सुध्दा हसून मन मोकळे करतात
असंच आयुष्य कट्टतात अशीच परिस्थिती
बदललेली आपल्या समोर दिसतात......
कधी कधी ज्याचं चेहरा
पाहु वाटतं नाहीं तो समोरचं दिसतो
कधी कधी नको दिसायला अस होतो
एक अनुभव आलेला असतो
तोच प्रत्येकाला छळतो.....
कधी कुणाची हसून घेऊ नका शब्दांची मजा
उद्या वेळ आपली सुध्दा येईल. तेव्हा रडून
म्हणून का भोगू मी सजा?? .....
