कधी कधी आपल्या सर्वांच्या
कधी कधी आपल्या सर्वांच्या
कधी कधी आपल्या सर्वांच्या
बाबतीत एक किस्सा बनतो.
आपण ज्यांची आठवण काढतो तोच
आपल्या समोर चेहरा दिसतो.......
आपण एखाद्याला आधी
त्याच्या विषयी कांही सांगतो.
भेटल्यावर आपल्याला बोलतो.......
आताच तू मला कांही बाही बोलून
मोकळा झालेला असतो तु
का गप्प बसून राहतो.....
कसा बघा प्रत्येकाच्या आयुष्यात
पहिल्यांदा योगायोग येतो. त्यावेळी
कुणालाच कांही कळतं नसतो......
असंच काहीसं म्हणावं लागतं
आपण सगळेच हरकून जातो.
कधी चुकीचा वागलेला आढळतो
कधी बरोबर सल्ला दिलेला वाटतो
कधी कुणासोबत हितगूज करताना
लक्षात आलेला अन त्याच्याशी
मैत्री झालेला असतो.......
कधी तो आपल्याला सोबत घेऊन
मनांत एक स्थान निर्माण करतो.
कधी आपली भूमिका पार पाडतो
कधी आपल्याला सप्रेम भेट देत
निघून जातो.....
आपलीच चर्चा सुरू करून स्वतःचा
मार्ग सुकर मोकळा श्वास रोखून
आपला हात त्याच्या हातात घट
मिठीत विसावुन काहीतरी वेगळं
आपुलकी जिव्हाळा धरून आणतो......
कितीही दूर गेला तरी आपली
कहानी इतरांना सांगू पहातो.
आपल्याच माणसांची कीर्ती
समाजात पसरवून टाकतो
असाच एक आपला जिवाभावाचा
हिस्सा बनतो......
आज उदया येईल असे वाक्य
बोलतो पुढील काळात अनेक
ठिकाणी आपलीच छबी
मिरवून जगाला ओरडून सांगतो.....
कधी कुणाची स्तुती करतो
कधी कुणाची समजूत काढतो
कधी कुणाची बाजू मजबूत करून देतो
जीवनाला एक आकार आणतो......
कधी कधी आपल्या सर्वांच्या
बाबतीत एक किस्सा बनतो.
आपण ज्यांची आठवण तोच
डोळ्यासमोर दिसतो.......
तुमच्या भावना अनावर होतात
त्या पाहून तुमचं मनं प्रफुल्लित होऊन जातो
अन आताच तुझा विषय काढला होता...
वर बोलतात तु कुठं होता... तुझ्याच गावांत होतो
असं बोलत असतो......
काहीं गोष्टीला लगाम घालावा लागतो
प्रत्येक माणूस त्यातून निभावून गेलेला वाटतो.
असाच अनुभव सर्वांच्या आयुष्यात येतं राहतो........
