कौतुकाचे ऊस गोड
कौतुकाचे ऊस गोड
1 min
130
चार शब्द कौतुकाचे
कौतुकाचे ऊस गोड
नको कोरडे कौतुक
थोडी प्रेमाचीही जोड
छान म्हणाया कुणाला
कुठे लागती हो पैसे
सदा बोलावे तोडून
कुठे लिहिले का ऐसे?
अरे वाह! किती छान
शब्द असती लहान
बोलतांना कुणालाही
कधी सुटावे ना भान
एक शब्द कौतुकाचा
दुजा वाटतो मोलाचा
त्याचे समाधान भारी
हुरूपही वाढे त्याचा
परि फाजील कौतुक
मुळी नसे हो कामाचे
कौतुकाने गेला वाया
बोल कशाला कुणाचे?
ठेवा प्रमाणात सारे
बोला कधी सडेतोड
खाईनात मुळासंगे
जरी ऊस भारी गोड