कौतुक...!
कौतुक...!
1 min
281
लोक कौतुक करतात किती
नवल वाटते माझे मला
सौन्दर्याची देणगी अशी
अप्रुप त्याचेही असते मला...
प्रत्येक बारीक सारीक
गोष्टींचे असते वेगळेच मोल
कौतुकाचे निवडक शब्दही
कधी कधी ठरतात फोल....
हास्य माझे लाजिरवाणे
उठतात उरी सौख्य उमाळे
खुलते गालावरी खळी
पाहते जगातील प्रत्येक आळी...
आज मात्र वेगळेच घडले
माझ्या ओठी हसू फुटले
त्याचेही मज नवल वाटले
जेंव्हा मनी आगळे स्वप्न नटले....!
अनेक अनेक शुभ कामना...!
