कौटुंबिक जिव्हाळा
कौटुंबिक जिव्हाळा
माहेरच्या उंबरठ्यापलीकडे
पाऊलवाट रस्ता बनते तेव्हा,
त्या पाऊलवाटेला अनेक लहानमोठ्या वाटा जुळत जातात,
त्या वाटांवरची कुटुंबे गप्पांमधून माझ्याशी बोलू लागतात...
ते बोलणं असतं कधी हृदयस्थ, आपुलकीचं, मायेचं, प्रेमाचं, कष्टाचं, मेहनतीचं, एकमेकांच्या साथीचं...
तर कधी धोक्याचं, नात्यातल्या नात्यात गुंतलेलं...
तर कधी सहजच जोडत गेलेल्या माणसांचं, असुयेपोटी तुटलेल्या नात्याचं, विखारी शब्दांचं, यशाचं- अपयशाचं,
सुख- दुःखाचं, आंधळ्या विश्वासाचं, फुटक्या नशीबाचं...
मग मी पुन्हा नव्याने जोडली जाते त्या त्या वेळेपुरती का होत नाही
पण काळाच्या रेट्यात दुरावलेल्या नात्यागोत्यातील मुला-माणसांशी ...
काळामागून काळ उलटत तर जातो
रस्ता मग लांबचा पल्ला बनत जातो
गप्पांतील नाती सैल होत जातात
पुन्हा नव्याने मग सुट्टीतल्या मनमोकळ्या गप्पांतच भेटतात....
