कैरी
कैरी
हिरव्यागार झाडावर हिरवीगार कैरी
जगात नाही कोणी तिचा वैरी
तिखट मीठ लावून चाखण्याची न्यारी गोडी
काचेच्या बरणीत दडल्या खारात लोणच्याच्या फोडी
साखरआंबा, गुळंबा चाखत माखत पोळीबरोबर खायचा
छुंदा तो शिक्षा केल्यासारखा उन्हात उभा रहायचा
इलायची घालून प्याल्यात भरून ठेवले पन्हं
सोनूल्याला थोड पाजलं, परत परत मागू लागलं तान्हं
डोहाळे लागले की खावीशी वाटते मिठातली कैरी, आनंदाला पुर
डोहाळे पुरवायला आईचा भरून येतो उर
जादूगार कैरी बदलते आपलं रुप
आंबा होतो तिचा, आनंद होतो खूप ॥