काय जपावे
काय जपावे
1 min
179
पाय जपावे वळणाआधी,
तोल जपावे ढळण्याआधी,
अन्न जपावे विटण्याआधी,
नाते जपावे तुटण्याआधी,
शब्द जपावे बोलण्याआधी,
अर्थ जपावे मांडण्याआधी,
रंग जपावे उडण्याआधी,
मन जपावे मोडण्याआधी,
अश्रू जपावे हसण्याआधी,
श्वास जपावे पळण्याआधी,
वस्त्र जपावे मळण्याआधी,
हात जपावे मागण्या आधी,
राग जपावे भांडणाआधी,
मित्र जपावे रुसण्याआधी,
