काय झाल ?
काय झाल ?
1 min
401
काय झालं ?
कसं झालं ?
केव्हा झालं ?
काहीच समजेना
उत्तर शोधताना
प्रश्नच हरवले
मौनांच मोहोळ
काही केल्या उठेच ना
स्पंदनाचा वेध
लागता लागेना
द्वंध तर चालूच आहे
कधी सुखाशी तर
कधी दुःखाशी
दुःख उन्हानं करपतय
सुख सावलीत काही मावेना
स्वप्नांची मलमल
वास्तवात उतरत चाललीय
काय झालं, कसं झालं
काही केल्या समजेना.
