STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

काव्यमय गोष्ट...

काव्यमय गोष्ट...

1 min
404

शाळेत एकदा

स्पर्धा ठरली

सुंदर हातांची

मुलगी शोधायची...


बाईंनी बक्षीस 

छान ठरवले

मुलींनी सार्‍या 

मनावर घेतले...


एकीने लावली 

लालचुटूक मेंदी

एकजण होती

बांगड्यांची छंदी...


एकीने झकास

अंगठी घातली

एकीने छान

नखे रंगविली...


स्पर्धेचा दिवस

आता उजाडला

सार्‍या जणी

लागल्या कामाला...


मीनाने स्पर्धेत भाग

काही घेतला नाही

बाई आल्या वर्गात

त्यांना हात दाखवला नाही...


सार्‍या मुलींचे 

हात बाईंनी पाहिले 

मीनाकडे बाईंचे

सारे लक्ष लागले...


मीनाने तिचा हात 

मागे पटकन घेतला

बाईंना शंका आली

त्यांनी हात पाहिला...


हात होता चरबट

रेघात राख होती

आईला ती कामात

मदत करत होती...


बाईंनी तिचा मग 

हात वर उंचावला

सुंदर हातांचा किताब

मीनाला बहाल केला...


मीनाचे हात होते

कामसू निबर हात 

त्या हाताने आईला 

मिळत होता मदतीचा हात...


Rate this content
Log in