काव्यगाथा स्वातंत्र्याची
काव्यगाथा स्वातंत्र्याची
1 min
363
तिरंगा माझा स्वातंत्र्याचा
ध्वज फडकतो किती छान
राष्ट्रगीताचा राखू मान
एकमुखाने गाऊया गुणगान
स्वातंत्र्य दिवस देशभरात
साजरे होतात थाटामाटात
स्वागत त्याला मान देऊन
वंदन तिरंगाला असूद्या वेशात
तीन रंगाचा फडकती झेंडा
देश आमुचा स्वतंत्र लढ्याचा
अभिमान धरती मातेचा करूया
देशबांधवांना संघटित नेण्याचा
देशाचे कैवारी एकजुटीने
समाजाची करूया बांधिलकी
जपली जाणारी संस्कृती
धैर्याने जिंकूया संपूर्ण नाती
देशासाठी लढले जवान
प्राण गमवावा लागला सीमेवर
त्यांच्या कार्याला सलामी
देऊन गेले आमचे शूरवीर
