काव्यचकोर
काव्यचकोर
1 min
24.4K
शब्दमोत्यांच्या संगतीत
मनामनातील हे अंतरंग
प्रेमाच्या उत्कट भावना
उठू लागले हळूवार तरंग...
आशेच्या या हिंदोळ्यात
निराशेने दिले झोकून
स्वप्नांची झाली बाग
सारेच भासमान गेले वाटून...
काव्यललना, काव्यचकोर
कवितांच्या उद्यानी गेली
एक एक शब्द मोतीसमान
टिपून आणू लागली...
सागरासम या शब्दांमध्ये
गुडघाभरही अजून गेले नाही
काव्य करू लागलेय खरी
काव्याचे नंदनवन खुललेय सही...
पंख लावीन मग काव्याचे
असा येतो विचार मनी
मानवधर्म, माणुसकी सोडणार नाही
जीव आहे जोवर या तनी...
