काव्यानंद
काव्यानंद
1 min
894
काव्यानंदाचे साद
ऐकू येतात कानी
काव्यात रमल्यावर
लिहिते मी कहाणी....॥
स्व विकसित गोष्ट
त्यातच मी मांडते
नवनवीन वाटचाल
त्यातच मी शोधते....॥
हरवलेल्या क्षणांना
मृगजळी आभासले
मयुरपंखी स्वप्नांना
काव्यानंदने ग्रासले.....॥
स्पष्ट लिहिल्या खुणा
मार्ग कसा रे भुलला
काव्यनंदचा किनारा
त्यात मज सापडला....॥
छंद वेगळे काव्याचे
कुठवरी जोपासणे
भाव माझ्या मनातले
झाले किती देखणे....॥