STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Others

2  

दिपमाला अहिरे

Others

काव्य

काव्य

1 min
57

काव्य स्फुरण, काव्य चिंतन

काव्य गंध, काव्य मनन.

काव्य म्हणजे मोत्यांमधील शब्दांची गाठ

काव्य जणु भावनांची मनमोकळी वाट

शब्दांचे सारे जुळवून भावबंध

काव्य लेखनाचा जपते मी छंद!!


काव्य थोडक्यात शब्दांची मांडणी

पण अचुक जाऊन पोहचते ती वाचकांच्या मनी

काव्य कधी काळजाचा ठाव घेणारे

काव्य कधी निशब्द तर कधी अबोल करणारे!!


काव्य म्हणजे शब्दांनी सजवली शब्दांची मैफिल

काव्य म्हणजे शब्दांना अलवार पेलणारे 

काव्य म्हणजे शब्दांनी भरलेली ओंजळ!!


Rate this content
Log in