काव्य प्रेमी ....
काव्य प्रेमी ....
प्रेम हे सगळयांनाच होत
काहींना डोळ्यातून तर काहींना मनातून ....
मी पण प्रेमात पडले ते मनापासून ..
चौदा वर्षांपूर्वी ओळख झाली...आमची...
तुटक तुटक बोलण्यानी झाली सुरूवात आमच्या मैत्रीची...
हळूहळू सुर आमचे जुळु लागले...मधुर ते गुणगुणू लागले...
मैत्रीचे नाते कधीच आपलेसे झाले ....
डायरी पण भरली माझी प्रेमाच्या ओळींनी...
सहवास हवा हवा सा वाटू लागला क्षणोक्षणी ....
कधी केले कळलंच नाही मान्य माझ्या मनान की तु प्रेमात पडलीस...
मग काय मी पण मान्य केले माझे प्रेम जगजाहीर...
आता ही माझ प्रेम आहे माझ्या सोबत आता तर आमचं अतुट नातं आहे जन्म भरासाठी..
माझं प्रेम म्हणजे कविता जी नी मला नवी ओळख दिली ...
