काठी ....
काठी ....
प्रत्येक माणसाला वयाची साठी लागली कि ज्येष्ठ नागरिकाचे पद होते बहाल ...
ज्येष्ठ नागरिक न म्हणता सर्रास सिनियर सिटीझनच जास्त म्हणतात ...
ह्या काळात मिळतो त्याना विशिष्ट दर्जा ...
थकलेला असतो त्याचा तो चेहरा ....
हक्काची मिळते सीट बसमध्ये ...
नाही राहव लागत बँकेत उभ्या रांगेमध्ये ....
प्रवासात ही असते तिकिटात कपात ...
सगळीकडे असते त्याचासाठी राखीव जागा ...
मर मर राबून रीटायरमेंट नंतरची हक्काची असते ती त्याची जागा ....
थरथरत्या शरिराला असतो तो आधार ....
काठीला असतो हाताचा भार...
मिळते आर्थिक मदत पेन्शनच्या रूपात तर काही करतात पोटभरण्याठी अजूनही काम ...
मिळतो त्याना आदराने सिनियर सिटीझनचा मान ...
पण कधी कधी त्याचीच माणसं आऊट डेटेड म्हूणन करतात त्याचा अपमान ...
