कातळ
कातळ
1 min
266
काळा कातळ कातळ
आत जमीनीच्या खोल
फुटे त्यातूनीच झरा
त्याचे भारीच हो मोल
कुणी म्हणती पाषाण
कुणी म्हणती दगड
कुणी घडवितो मुर्ती
कुणी भक्कमसा गड
काळ्या पाषाणाची इथे
आहे देऊळा पायरी
प्रत्येकाला विणविते
इथे बसा घडीभरी
नका हिणवू चिडवू
नको फुका बडबड
दुःख जाणणे दुजाचे
नेहमीच अवघड
