STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

कास्तकार बाप

कास्तकार बाप

1 min
2.7K


माझा कास्तकार बाप

रातदिस राबे वावरा

दिसा वखरनी करे

रातच्याले जागली करे...


कास्तकार बाप माझा

दिसतो चिंतेत हे खर हाये

पण कधी म्हणे थोडी का राहेना

बर झाल मले वावर त हाये...


अल्पभूधारक आहो म्हूणसन 

सरकारी मदत पण भेटते

कर्ज बिर्जाचीबी कंदीमंदी साह्यरा होते

नाही म्हणल तरी जरासी सपसिढीबी भेटते...


मंधातले दलाल भाय तरास देते

त्यायिले कदीबदी घाला लागते चारा

आजकाल दिस महागाईचे आले

कर्ज उचल्याशिवाय विलाज नसे न्यारा...


तरीबी माह्य म्हणन हाये ताने

नौकरी करण्यापरिस वावर बर हाय

आपण आपल्या मर्जीचे मालक हावो

कव्हा नाही जाव वाटल अडत नाही काय...


आजकाल शिकूनबी नोकरी 

काही लागत नाही ताने 

सोताचा धंदा केला तर 

राजापरीस राह्यने....


शेती आपली माय सारखी

थे काही अंगावर ठेवत नाही ताने

काही ना काही कुरपा होतेच

तव्हाच का आपण समदे रायतो आनंदाने 


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন