कार्यकर्ता
कार्यकर्ता
1 min
950
ते लढ म्हणाले
मी लढलो..
ते सत्ताधीश झाले
मी अडगळीत पडलो..!!
ते नड म्हणाले
मी नडलो..
ते सहीसलामत सुटले
मी नाहक अडकलो..!!
ते चढ म्हणाले
मी चढलो..
त्यांनी पाय खेचले
मी तोंडघशी पडलो..!!
ते पेट म्हणाले
मी पेटलो..
त्यांनी पोळी शेकली
मी राख झालो..!!
ते राजा म्हणाले,
मी क्षणात हुळहुळलो..
त्यांनी केलेला अत्याचार
मी सहज विसरलो..!!
