कार्य अहिल्यादेवीचे
कार्य अहिल्यादेवीचे


महाराष्ट्राच्या चौंडी गावची कन्या मोठी भारी |
मराठा माळवा प्रांताचा ती कारभार सांभाळी ||
त्रिदशके सुशासन करुनी आदर्श दाखवून दिला |
शांतीने राज्य चालवून रयतेस सुखाचा मंत्र दिला ||
युध्दात स्वत: सैन्याचे नेतृत्व ती करत होती |
आपल्या प्रजेसाठी ती कल्यानाचे काम करत होती ||
उचित न्यायदानासाठी फार प्रसिद्ध होती |
शाशक म्हणून चांगले काम ती नेहमी करत होती ||
माळव्यात रस्ते, किल्ले बांधून विकास केला होता |
सती प्रथेला दूर सारुनी लोकांना पटवून दिला होता ||
चोरांचे मत परिवर्तन करुन त्यांना शेती दिली होती |
स्त्रीयांमधली अहिल्यादेवी उत्तम राज्यकर्ती होती ||
तीर्थक्षेत्रे जीर्णोद्धार करुनी धर्म रक्षण करीत होती |
जलकुंडे, अन्नछत्रे असे जागोजागी बांधले होती ||
स्व सुख सर्व त्यागुनी परोपकारी जीवन अर्पिला होता |
स्त्री शक्तीचा थोर महिमा साऱ्या जगास दाखविला होता ||