कारण सगळं झालंय सवयीचं...
कारण सगळं झालंय सवयीचं...
टी.व्ही. लावा त्याच चर्चा....
बलात्कार...दंगली..खून...
हा मोर्चा तो मोर्चा...
विशेष चर्चा... महाचर्चा..
सगळीकडे चर्चाच चर्चा...
कानांना काहीच वाटत नाही...
कारण सगळं झालंय सवयीचं.......
हा पक्ष तो पक्ष...
इथे मिळत नाही सज्जनास साक्ष...
कुणीच इथे राहत नाही दक्ष....
डोळ्यांना पण काही वाटत नाही...
कारण सगळं झालंय सवयीचं....
त्याचं घटना..त्याच बातम्या...
याचा निषेध.....त्याचा निषेध....
या मागण्या ...त्या मागण्या...
दंगली आणि जाळपोळ..
माणसांचे मेलेले मृतदेह....
मग नुसत्या जळतात मेणबत्त्या...
बहुदा नाकानाहीं काही वाटणार नाही....
आणि तेही होईल सवयीचं....
करू काही शकत नाही...
लिहून काही उपयोग नाही...
पुढे काही घडणार नाही...
कोणीच याविरोधात उतरणार नाही आणि याचं
हातांनाही काही वाटणार नाही...
कारण त्यांना पण होईल सवयीचं.....
