STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

कारकिर्द ( अभंग रचना )

कारकिर्द ( अभंग रचना )

1 min
211


खेळ कारकीर्द I निवडेल कोण ? I 

गुंते जरी मन | मैदानात ॥ १ ॥


खेळ व्यवसाय | कसा निवडावा ? I

लागे उचलावा I भार सारा ॥ २ ॥


मैदान खेळाचे I साद ते घालते |

पाय ते गाठते I कार्यालय ॥ ३ ॥


नोकरीच करी | त्यास मिळे मान I

खेळाचे सामान I अडगळी ॥ ४ ॥


खेळ शाळेतच । पोटास नोकरी I

ही जबाबदारी I पार पाडी ॥ ५ ॥


Rate this content
Log in